Betting on IPL match : आयपीएल सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या नऊ जणांना अटक

आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या शहरातील नऊजणांना अनैतिक मानवी वाहतूक विभागाने अटक केली आहे. ४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन लॅपटॉप, तेरा मोबाईलचा यात समावेश आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या क्रिकेट सामन्यावर आरोपी सट्टा खेळत होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 22 May 2023
  • 10:25 am

आयपीएल सामन्यावर सट्टा खेळणाऱ्या नऊ जणांना अटक

हिंजवडीत सुरू होता ऑनलाइन सट्टा

सीविक मिरर ब्यूरो

feedback@civicmirror.in

आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या शहरातील नऊजणांना अनैतिक मानवी वाहतूक विभागाने अटक केली आहे. ४ लाख ८१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. दोन लॅपटॉप, तेरा मोबाईलचा यात समावेश आहे. ही कारवाई हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली आहे. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या क्रिकेट सामन्यावर आरोपी सट्टा खेळत होते.

अवघ्या देशभर आयपीएल क्रिकेट सामने बघितले जात असून यावर बेटिंगदेखील मोठ्या प्रमाणावर चालत असल्याचे समोर आले आहे. पिंपरी–चिंचवड शहरात अनेकदा सट्टा घेणाऱ्या आणि ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या अशा दोन्ही व्यक्तींवर कारवाई केल्याचे पाहायला मिळाले आहे. हिंजवडी परिसरातील मारुंजी येथे वैभव बाबा राम डिक्कर आणि इतर काही व्यक्ती लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स या आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक विभागाला मिळाली. त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचून सट्टा खेळणाऱ्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांकडून दोन लॅपटॉप, तेरा मोबाईल असा एकूण ४ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest