पुणे आणि मुंबईत १८ ते २२ जून दरम्यान मान्सून दाखल होणार !

पुणे आणि मुंबईत १८ ते २२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हणजेच साधारण एक आठवडा उशिर होण्याची शक्यता आहे. केरळातील मान्सूनच्या आगमनानूसार, १० जून रोजी पुण्यात तर ११ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होणे अपेक्षित होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 16 Jun 2023
  • 04:32 pm
पुणे आणि मुंबईत १८ ते २२ जून दरम्यान मान्सून दाखल होणार !

पुणे आणि मुंबईत १८ ते २२ जून दरम्यान मान्सून दाखल होणार !

उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनच्या आगमनाला उशिर होणार !

पुणे आणि मुंबईत १८ ते २२ जूनच्या दरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. म्हणजेच साधारण एक आठवडा उशिर होण्याची शक्यता आहे. केरळातील मान्सूनच्या आगमनानूसार, १० जून रोजी पुण्यात तर ११ जून रोजी मुंबईत मान्सून दाखल होणे अपेक्षित होते.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रावर महाराष्ट्र ते केरळ किनारपट्टीवर कुंड तयार झाल्यामुळे येत्या काही दिवसांत अरबी समुद्राच्या शाखा मजबूत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल असेल. १८ जून ते २२ जून या कालावधीत पुणे आणि मुंबईसह महाराष्ट्रातील अधिक भागात मान्सून दाखल होईल. मात्र, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सून दाखल होण्यात अधिक वेळ लागू शकतो.

महाराष्ट्रातील काही भागात २३ जूनपासून मान्सून सक्रीय होईल. तर जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या सुरुवातीच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र, विदर्भात पावसाला विलंब होणार असल्याने काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest