Marketyard : कागद रद्दीच्या गोडाऊनला भीषण आग

पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील गोलमार्केट येथे कागद रद्दी आणि काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली होती. ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवात या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील दोन टेम्पो जळून खाक झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 29 May 2023
  • 09:58 am

कागद रद्दीच्या गोडाऊनला भीषण आग

भीषण आगीत गोडाऊनमधील दोन टेम्पोही जळाले

पुण्यातील मार्केटयार्ड (Marketyard) परिसरातील गोलमार्केट येथे कागद रद्दी आणि काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या गोडाऊनला भीषण (fire) आग लागली होती. ही घटना रविवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, गोडाऊनमधील दोन टेम्पो (tempo) जळून खाक झाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मार्केटयार्ड परिसरातील गोलमार्केट येथील कागद रद्दी आणि काही प्रमाणात पुठ्ठा असणाऱ्या गोडाऊनला मध्यरात्री १ च्या सुमारास भीषण आग लागली होती. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या सुमारे ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर तब्बल १ तासाच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझवण्यास यश आले.

यावेळी आजूबाजूच्या परिसरात आग पसरू नये, यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी गोडाऊनचे कुलूप तोडून चोहोबाजूने पाण्याचा मारा केला. तसेच गोडाऊनमध्ये कोणी कामगार अडकला आहे का, याची चौकशी केली. सुदैवाने आत कोणी नसल्याने जीवितहानी टळली. मात्र, गोडाऊनचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच गोडाऊनमधे असलेले दोन टेम्पो जळून खाक झाले आहेत. मात्र, नुकसान व आगीचे कारण समजू शकलेले नाही. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest