पुणे : बावधन वनक्षेत्रातील तलाव आटला; वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण वनविभागाकडून जलसाठे पुरेसे असल्याचा दावा

शहरात उन्हाची काहिली वाढत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वन्य जीवांची देखील परवड होताना दिसत आहे. बावधन येथील भांबुर्डा वनपरीक्षेत्राच्या हद्दीत असलेला पाण्याचा तलाव आटला आहे.

Pune News

बावधन वनक्षेत्रातील तलाव आटला; वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण वनविभागाकडून जलसाठे पुरेसे असल्याचा दावा

पुणे : शहरात उन्हाची काहिली वाढत चालली आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वन्य जीवांची देखील परवड होताना दिसत आहे. बावधन येथील भांबुर्डा वनपरीक्षेत्राच्या हद्दीत असलेला पाण्याचा तलाव आटला आहे. कोरड्या पडलेल्या या तलावामुळे वन्यजीवांना पाण्यासाठी अन्य जलस्त्रोतांवर जावे लागत आहे. वन्यजीवांची देखील पाण्यासाठी वणवण सुरू झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, वन्य जीवांसाठी पाण्याची उपलब्धता करून द्यावी अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिक करीत आहेत. (Pune News)

शहराच्या पश्चिम भागात असलेल्या भांबुर्डा परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर वन्य प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात. यामध्ये हरीण, काळवीट, रानडुक्कर, ससे, मोर, लांडोर, सायाळ, आदी प्राणी व पक्षांचा समावेश आहे. या वन्यजीवांचा या वनपरीक्षेत्रात मुक्त विहार असतो. तसेच, या परिक्षेत्रात जंगली श्वापदे देखील यापूर्वी आढळून आलेली आहेत. सध्या उन्हाचा तडाखा वाढलेला आहे. त्यामुळे धारणामधील पाणी स्तर कमी झाला आहे. यासोबतच, वनपरीक्षेत्रातील नैसर्गिक पानवठे देखील आटू लागले आहेत. हे वन्यजीव पाणी पिण्यासाठी जात असलेला बावधन येथील तलाव देखील आटला आहे. या ठिकाणी पाण्यावर येणाऱ्या वन्यजीवांना त्यामुळे अन्य ठिकाणचे पाणवठे शोधत जावे लागत आहे. दोन आठवड्यांपूर्वी पाण्याच्या शोधात फिरत असलेले एक हरीण एनडीए हद्दीतील कोंढवे धावडे परिसरात आले होते. रस्ता चुकलेल्या या हरणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता. जखमी हरणावर वणविभागाने उपचार केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. वन क्षेत्रात पाणी उपलब्ध होत नसल्याने त्याचा बळी गेल्याची खंत पर्यावरण प्रेमी नागरिकांनी व्यक्त केली होती. 

दरम्यान, याविषयी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ म्हणाले, कि बावधन येथील कोरडा पडलेला तलाव हा रान तलाव आहे. या तलावात पावसाळ्यात पाणी भरते. हे पाणी साधारण फेब्रुवारी-मार्चपर्यंत वन्यजीवांना पुरते. मात्र, यंदा इथले पाणी लवकर आटले आहे. तरीदेखील काळजीचे कारण नाही. कारण, या परिक्षेत्रात आणखी दोन तलाव आहेत. त्यामध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध आहे. यासोबतच रस्त्यांच्या कडेला मोठ्या भांड्यांमध्ये देखील पाणी भरून ठेवले जात आहे. वन्यजीवांना पाणी कमी पडणार नाही याची काळजी वन विभागाकडून घेतली जात आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest