पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, मार्केटयार्ड परिसरातील गाड्यांची तोडफोड

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात चार ते पाच टोळक्याने पुन्हा एकदा कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात क्रिकेट खेळत असणाऱ्या मुलांना देखील या टोळक्यांनी धमकावले होते. तसेच आजूबाजूला असणाऱ्या गाड्यांचे देखील कोयत्याने घाव घालून नुकसान केले आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 market yard : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, मार्केटयार्ड परिसरातील गाड्यांची तोडफोड

market yard : पुण्यात कोयता गँगची पुन्हा दहशत, मार्केटयार्ड परिसरातील गाड्यांची तोडफोड

चार ते पाच टोळक्यांनी केली वाहनांची तोडफोड

पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात चार ते पाच टोळक्याने पुन्हा एकदा कोयते हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बुधवारी रात्रीच्या सुमारास मार्केट यार्ड परिसरात क्रिकेट खेळत असणाऱ्या मुलांना देखील या टोळक्यांनी धमकावले होते. तसेच आजूबाजूला असणाऱ्या गाड्यांचे देखील कोयत्याने घाव घालून नुकसान केले आहे. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी बाळू बाबू पवार, अभि वाघमारे, विशाल उर्फ नकट्या पाटोळे, डुई त्याच्यासह आणखी एका वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व घटनेबाबत भैरू प्रसाद सेन याने पोलिसात तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरात बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हे सर्वजण क्रिकेट खेळत असताना चार ते पाच जण हातात कोयते घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. ज्या मैदानावर सर्वजण क्रिकेट खेळत होते त्या मैदानात दगड देखील फेकण्यात आले होते. हातात कोयते घेऊन शिवीगाळ करत खेळत बंद करण्यासाठी धमकावले. इतकेच नाही तर फिर्यादी यांना बॅटने देखील मारहाण करण्यात आली. या सर्व प्रकरणी तपास करत असताना मार्केट यार्ड पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story