शत्रुंजय जैन मंदिरातील दानपेटी फोडल्या, सात जण ताब्यात
पुण्यातील कोंढवा रोडवरील शत्रुंजय जैन मंदिर बंद असताना पाच ते जणांनी रात्रीच्या वेळी दानपेटी फोडून त्यातील पैसे चोरले होते. ही घटना २४ एप्रिल २०२३ रोजी घडली होती. चोरट्यांनी मोक्यातील आरोपीला जामीनावर बाहेर काढण्यासाठी मंदीरात चोरी केली होती. आता या प्रकरणी तीन चोरट्यांना अटक केली आहे. तर इतर ४ अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.
हसन मगदूम बादशहा (वय १८), तेजस दीपक सनस (वय १९), आदित्य राजू गाड (वय १८) यांना अटक करण्यात आले आहे. तर इतर ४ अल्पवयीन मुलांना कोंढवा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा रोडवरील शत्रुंजय जैन मंदिर बंद असताना पाच ते जणांनी रात्रीच्या वेळी मंदिराच्या दक्षिण दरवाजात कडील खिडकीची काच फोडून आत प्रवेश केला होता. मंदिरात असणाऱ्या चार दान पेट्या फोडून त्यामधील पैसे चोरी करून आरोपींनी तेथून पळ काढला होता.
याबाबत कोंढवा पोलीस स्टेशन येथे राजकुमार बन्सीलाल राजपूत यांनी फिर्याद दिली होती. याबाबतचा तपास पोलीस करत असताना एक आरोपी कात्रज येथील ५१ मंदिराजवळ उभा असल्याची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता इतर आरोपींचा शोध लागला. त्याच्याकडून ३७ हजार २१२ रुपये जप्त केले आहेत. मोक्क्यातील आरोपी असणाऱ्या मित्र ऋषिकेश गाडे याला जामीनावर बाहेर काढण्यासाठी कात्रज कोंढवा रोडवरील जैन मंदिरातील दान पेट्या फोडून या आरोपींनी चोरी केली होती. या आरोपींवर कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.