खंडाळा घाट : भरधाव कंटेनर पिकअप टेम्पोवर झाला पलटी, चालकाचा जागीच मृत्यू

भरधाव वेगातील कंटेनर समोर जाणाऱ्या दोन पिकअप टेम्पोला धडकला. त्यानंतर एका पिकअप टेम्पोवर पलटी झाला. या भीषण अपघातामध्ये पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 24 Jun 2023
  • 10:22 am
भरधाव कंटेनर पिकअप टेम्पोवर झाला पटली, चालकाचा जागीच मृत्यू

भरधाव कंटेनर पिकअप टेम्पोवर झाला पटली

भीषण अपघातात दोन जण जखमी

भरधाव वेगातील कंटेनर समोर जाणाऱ्या दोन पिकअप टेम्पोला धडकला. त्यानंतर एका पिकअप टेम्पोवर पलटी झाला. या भीषण अपघातामध्ये पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात मुंबई-पुणे महामार्गावरील खंडाळा घाटातील अंडा पॉईंट येथील वळणावर सकाळच्या सुमारास झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधावर कंटेनर मुंबईच्या दिशेने निघाला होता. अंडा पॉईंट येथील उवळणावर आला असता चालकाचा कंटेनरवरील ताबा सुटला. त्यामुळे कंटेनरची दोन पिकअप टेम्पो गाड्यांना धडक बसली. त्यातील एका पिकअप टेम्पोवर कंटेनर पलटी झाला. यामध्ये पिकअप चालकाचा कंटेनर खाली चिरडून जागीच मृत्यू झाला.

या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका शाळकरी मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस यंत्रणा, खोपोली पोलीस, आय आर बी, यांच्यासह विविध यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. मात्र, हा अपघात इतका भीषण होता की पिकअपचा चक्काचूर झाला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest