कात्रज : तांब्याची भांडी बनवणाऱ्या कंपनीत चोरी, अल्पवयीन मुलगा ताब्यात

तांब्याची भांडी बनविणाऱ्या कंपनीचे पत्र्याचे शेड उचकाटुन कंपनीतील २ लाख रुपयांची ताब्यांची भांडी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार ९ मे रोजी रात्री १० ते १० मे रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पुण्यातील कात्रज येथील गुजरवाडी निंबाळकर वाडी रोडवरील रिया एंन्टरप्रायझेसमध्ये घडला होता. या प्रकरणी पोलीसांनी एका अल्पवयीन मुलासह १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 25 May 2023
  • 01:16 pm
तांब्याची भांडी बनवणाऱ्या कंपनीत चोरी, अल्पवयीन मुलागा ताब्यात

अल्पवयीन मुलागा ताब्यात

चोरीची १ लाख रुपयांची तांब्याची भांडी जप्त

तांब्याची भांडी बनविणाऱ्या कंपनीचे पत्र्याचे शेड उचकाटुन कंपनीतील २ लाख रुपयांची ताब्यांची भांडी चोरुन नेल्याचा प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार ९ मे रोजी रात्री १० ते १० मे रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पुण्यातील कात्रज येथील गुजरवाडी निंबाळकर वाडी रोडवरील रिया एंन्टरप्रायझेसमध्ये घडला होता. या प्रकरणी पोलीसांनी एका अल्पवयीन मुलासह १ लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे.

भारती विद्यापीठ पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कात्रज येथील गुजरवाडी निंबाळकर वाडी रोडवर रिया एंन्टरप्रायझेस नावाची तांब्याची भांडी बनवणारी कंपनी आहे. या कंपनीतील तांब्याची २ लाख रुपयांची भांडी ९ मे रोजी रात्री १० ते १० मे रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान चोरीला गेली होती. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.

या प्रकरणाचा शोध घेत असताना भारती विद्यापीठ पोलीसांनी एका अल्पवयीन मुलासह त्याच्या साथीदाराला निगडीतून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून गुन्हयातील चोरी केलेल्या तांब्याच्या भांडयांपैकी १ लाख रुपये किंमतीची सुमारे ७० किलो वजनाची तांब्याची भांडी जप्त केली आहेत. यावेळी त्याची कसून चौकशी केली असता सदरची चोरी आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने केली असल्याची त्याने कबूली दिली. सध्या भारती विद्यापीठ पोलीस त्याच्या इतर साथीदारांचा आणि उर्वरीत तांब्याची भांडी व प्लेटांचा शोध घेत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest