पुण्यातील कसबा गणपती मंदिरात जाताय, मग पाळावे लागतील 'हे' नियम!
पुण्याचे ग्रामदैवत असणाऱ्या कसबा गणपती मंदिरा बाहेर जो बोर्ड लावण्यात आला आहे त्याने आता पुणेकरांचे लक्ष वेधून घेण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी पुण्यात एखाद्या मंदिरा बाहेर अशा स्वरूपाचा फलक लावल्याचे एकिवात नाही. मात्र या फलकाने मात्र वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. (Kasba Ganpati)
त्यामुळे तुम्ही जर आता कसबा गणपती मंदिरात जाणार असाल तर तुमचा 'अवतार ' एकदा पाहून घ्याल. कदाचित तुम्हाला तुमच्या कपड्यांमुळे मंदिरात जाण्यास मनाई करण्यात येईल. असेही बोलले जात आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने लावण्यात आलेल्या त्या बोर्ड वर तुम्ही मंदिरात जाणार असाल तर काय परिधान करू नये याची नियमावली सांगण्यात आली आहे.
याबाबत मंदिराचे विश्वस्त यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्हला हा बोर्ड कुणी लावला याविषयी काहीही माहिती नाही. आम्ही सर्व विश्वस्त मंडळ याचा तपास करत आहोत. असे म्हटले आहे.