Karvenagar : भरधाव दुचाकीने पादचारी महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू

एका भरधाव दुचाकीने पादचारी महिलेला जोरदार धडक दिल्याची घटना घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर परिसरातील हिंगणे होम कॉलनीमध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 29 May 2023
  • 10:51 am
भरधाव दुचाकीने पादचारी महिलेला उडवले, उपचारादरम्यान मृत्यू

अपघात

अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

एका भरधाव दुचाकीने (bike) पादचारी महिलेला जोरदार धडक (Accident) दिल्याची घटना घडली होती. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, अखेर उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना पुण्यातील कर्वेनगर (Karvenagar) परिसरातील हिंगणे होम कॉलनीमध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

कर्वेनगर परिसरातील हिंगणे होम कॉलनीमध्ये १६ मे रोजी सकाळी १० च्या सुमारास एक पहिला रस्त्याने चालत होती. यावेळी समोरून दुचाकीवर भरधाव वेगात येणाऱ्या युवकाने महिलेला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान अखेर महिलेचा मृत्यू झाला आहे.

हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी भरधाव दुचाकी चालवणाऱ्या युवकावर पोलीसांनी कारवाई केली आहे. शहरातील कर्वेनगर परिसर व उपनगरामध्ये अल्पवयीन मुलांकडून बेफाम पद्धतीने गाड्या चालवल्या जातात. हा बेफामपणा महिलेच्या जीवावर भेतल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

काही दिवसांपूर्वीच श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या समोर सामाजिक कार्यकर्ते समीर वसवे यांच्या मातोश्री रंजना प्रकाश वसवे यांचे नुकतेच एका बेफाम दुचाकीस्वाराने उडवल्यामुळे निधन झालेला आहे. पुढील अशाच प्रकारचे अपघात टाळण्यासाठी याच्यावर ठोस अशी उपाययोजना करणे फार गरजेचे आहे, जनजागृती करणे, ठिक ठिकाणी बोर्ड, बॅनर लावणे ही काळाची गरज आहे, महत्त्वाच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर करणे जरी अडचणीचे ठरणार असले तरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, विना विलंब स्पीड ब्रेकर करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष आनंद तांबे यांनी केली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest