Alimony
पुण्यातील एक अजब प्रकार समोर आला आहे. एका उच्च शिक्षित महिलेनेच आपल्याच पतीला ५० हजाराची पोटगी दिली आहे. एवढेच नाही तर दोघांचा घटस्फोटही न्यायालयाने मंजूर केले आहे. अवघ्या चार वर्षापुर्वीच या दाम्पत्याचे लग्न झाले होते. पुण्यातील दिवाणी न्यायाधीश एस. व्ही. फुलबांधे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
एका ३३ वर्षीय महिलेचे ३८ वर्षीय (संबंधित वय आताचे आहे) पुरूषासोबत ऑगस्ट २०१८ मध्ये लग्न झाले होते. महिलेचे एम.टेक तर पुरूषाचे बी. टेक शिक्षण झाले आहे. मात्र, लग्नानंतर सुरूवातीचे काही दिवस व्यवस्थित गेल्यानतंर दोघांमध्ये वैचारिक मतभेद निर्माण झाले. त्यानंतर दोघेही एकमेकांपासून दूर राहत आहेत. त्यांना अद्याप कोणतेही अपत्य नाही.
वेगळे राहत असतानाही दोघांचे मन जुळत नसल्याने अखेर ३ मार्च २०२२ रोजी पतीने पोटगीसाठी अर्ज केला. पतीने अर्ज केल्यानंतर पत्नीनेही अर्ज केला. यावेळी पतीकडून वकिल नरेंद्र के. बाबरे यांनी बाजू मांडली. मात्र, न्यायालयाच्या कारवाईमध्ये पत्नीने दाखल केलेले कागदपत्रे बनावट आणि दिशाभूल करणारे असल्याचे समोर आले. त्यात कोणतेही तथ्य नसल्याचे उघड झाले. त्यामुळे अखेर न्यायालयाने पतीला कायमस्वरूपी पोटगी म्हणून पत्नीने ५० हजार रुपये द्यावे, असा निर्णय दिला.