पुण्यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

शहरातील विविध पोलीस ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी रात्री आदेश जारी केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 20 Jun 2023
  • 12:55 pm
inspectors in Pune : पुण्यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुण्यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

कोणाची कुठे झाली बदली ?

पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. शहरातील विविध पोलीस ठाण्यातील १४ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी सोमवारी रात्री आदेश जारी केले.

कोणत्या पोलीस अधिकाऱ्याची कुठे झाली बदली ?

  1. संगीता सुनिल जाधव (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बिबवेवाडी पोलीस ठाण्यातून गुन्हे शाखेत, भरोसा सेल)
  2. अशोक धर्माजी इंदलकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाण्यातून वाहतूक शाखेत)
  3. सुनिल काशिनाथ झावरे (आर्थिक गुन्हे शाखेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस ठाण्यात)
  4. विष्णू नाथा ताम्हाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खडकी पोलीस ठाण्यातून मुंढवा पोलीस ठाण्यात)
  5. राजेंद्र विठ्ठलराव सहाणे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अलंकार पोलीस ठाण्यातून खडकी पोलीस ठाण्यात)
  6. राजेश रामचंद्र तटकरे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लष्कर पोलीस ठाण्यातून अलंकार पोलीस ठाण्यात)
  7. सुनिल पांडुरंग जैतापुरकर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाण्यातून वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात)
  8. किरण बाळासाहेब बालवडकर (वाहतूक शाखेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उत्तमनगर पोलीस ठाण्यात)
  9. दगडू सयप्पा हाके (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातून सायबर पोलीस ठाण्यात)
  10. सुनिल बाबुराव माने (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाण्यातून खडक पोलीस ठाण्यात)
  11. विनायक बाजीराव वेताळ (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यातून आर्थिक गुन्हे शाखेत)
  12. निलीमा नितीन पवार (वाहतूक शाखेतून वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोरेगांव पार्क पोलीस ठाण्यात)
  13. दत्ताराम गोपीनाथ बागवे (पोलीस निरीक्षक, गुन्हे, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातून विशेष शाखेत)
  14. अजय सुधीर कुलकर्णी (आर्थिक गुन्हे शाखेतून पोलीस निरीक्षक, गुन्हे, वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात)

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest