संसारात ढवळाढवळ; जावयाने संपवले आयुष्य

पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीच्या घरातील मंडळींकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभय गवळी (वय ४१) असे या व्यक्तीचे नाव आहे. अभयला त्याची पत्नी, सासू, सासरे, मेव्हणा आणि एक अन्य या पाचजणांकडून मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अभयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Thu, 25 May 2023
  • 03:49 pm
संसारात ढवळाढवळ; जावयाने संपवले आयुष्य

संसारात ढवळाढवळ; जावयाने संपवले आयुष्य

हडपसर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पत्नीसह सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल

#हडपसर

पुण्यातील हडपसर भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने पत्नीच्या घरातील मंडळींकडून होणाऱ्या त्रासामुळे आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. अभय गवळी (वय ४१) असे या व्यक्तीचे नाव आहे. अभयला त्याची पत्नी, सासू, सासरे, मेव्हणा आणि एक अन्य या पाचजणांकडून मानसिक त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून अभयने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे हडपसर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अभय गवळी यांच्या आत्महत्येनंतर त्यांची पत्नी तृप्ती अभय गवळी, सासू उषा जालिंदर आंबवडे, सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे आणि सारिका आंबवडे या पाच जणांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अभय गवळी आणि तृप्ती गवळी यांचा विवाह जानेवारी २०१४ मध्ये झाला होता. ते दोघे पती-पत्नी शेवाळेवाडी येथील भडकलरनगर येथे राहण्यास होते. अभय आणि तृप्ती या दोघांचा विवाह झाल्यापासून सासू उषा जालिंदर आंबवडे, सासरे जालिंदर आंबवडे, मेव्हणा संतोष आंबवडे आणि सारिका आंबवडे हे अभय यांच्या संसारात ढवळाढवळ करीत होते. तसेच पत्नी तृप्ती या आई-वडिलांच्या सांगण्यानुसारच वागत होत्या. यावरून दोघांमध्ये अनेक वेळा वाद झाले. या सर्व सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून अभय गवळी यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अभय गवळी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये पत्नी तृप्ती गवळीसह सासरकडील चारजण मंडळी जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. त्यानुसार पाच जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest