पुणे विभागातील रेल्वे ट्रॅकची मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पाहणी

उत्तर सीमावर्ती रेल्वे झोनचे प्रधान मुख्य संरक्षा (सेफ्टी) अधिकारी सीताराम सिंकु यांनी २३ आणि २४ जून रोजी पुणे रेल्वे विभागावर विशेष सेफ्टी लेखापरीक्षण व निरीक्षण केले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 26 Jun 2023
  • 05:20 pm
पुणे विभागातील रेल्वे ट्रकची मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पाहणी

पुणे विभागातील रेल्वे ट्रॅकची मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांकडून पाहणी

उत्तर सीमावर्ती रेल्वे झोनचे प्रधान मुख्य संरक्षा (सेफ्टी) अधिकारी सीताराम सिंकु यांनी २३ आणि २४ जून रोजी पुणे रेल्वे विभागावर विशेष सेफ्टी लेखापरीक्षण व निरीक्षण केले. निरीक्षणादरम्यान विभागीय रेल्वे व्यवस्थापक इन्दु दुबे तसेच उत्तर सीमांत रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांची टीमसोबत होती.

यामध्ये मुख्य ट्रॅक अभियंता राम गोपाल, मुख्य सिग्नल आणि दूरसंचार अभियंता (पी अँड डी) के. के.   श्रीवास्तव, मुख्य यांत्रिक अभियंता के. एन. एस. यादव आणि ए. व्ही. पुरोहित, उप मुख्य संरक्षा  (सेफ्टी) अधिकारी - वाहतूक अशेश्वर झा आणि उपमुख्य संरक्षा (सेफ्टी) अधिकारी सिग्नल आणि दूरसंचार आशिष कुमार सिन्हा यांचा सहभाग होता. याशिवाय अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह यांच्यासह विभागीय सेफ्टी अधिकारी देवेंद्र कुमार हे पाहणीत सहभागी होते.

सीताराम सिंकु यांनी पुणे स्टेशन, यार्ड, कोचिंग मेंटेनन्स डेपो, पुणे आरआरआय आणि आणि सातारा येथील स्टेशन, यार्ड, रनिंग रूम इत्यादींची सखोल पाहणी केली. या दरम्यान त्यांनी गाडी परिचालनशी संबंधित कर्मचारी लोको पायलट, स्टेशन मैनेजर, ट्रैन मैनेजर (गार्ड), सिग्नल मेंटेनर, ट्रॅक मेन्टेनर यांचे म्हणणे ऐकून  त्यांच्या शंकांचे निरसन केले.

पाहणीनंतर त्यांनी विभागीय कार्यालयात विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश कुमार सिंह आणि विभागातील शाखा अधिकार्‍यांशी बैठक घेतली आणि रेल्वे संचालनाबाबत आवश्यक सेफ्टी नियमांबाबत सविस्तर चर्चा केली. याबाबात विभागावार होत असलेल्या कामांबाबत त्यांनी समाधान व्यक्त करून आवश्यक सूचना दिल्या.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest