पुण्यावरून दिल्लीसाठी यशस्वी उड्डाण
भारतीय बनावटीच्या पहिल्या जैविक इंधनावर चालणाऱ्या विमानाने यशस्वी उड्डाण केले आहे. विमान क्रमांक I5-767 या विमानाने शुक्रवारी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केले आणि दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षितपणे उतरले. यावेळी केंद्रीय पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या दिल्लीमध्ये या विमानाचे स्वागत केले.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) ने प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड (प्राज) सोबत भागीदारी करून स्वदेशी जैविक इंधनावर चालणारे विमान बनवले आहे. AirAsia India च्या i5-767 या निमानाने शुक्रवारी पुणे विमानतळावरून सकाळी ७:२६ वाजता उड्डाण केले आणि ९:४१ वाजता दिल्लीत उतरले. यावेळी बोलताना मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले की, “जैविक इंधनावर चालणाऱ्या स्वदेशी पहिल्या व्यावसायिक विमानाचे उड्डाण झाले. या ऐतिहासीक प्रसंगाचा साक्षीदार होताना मला अत्यंत आनंद होत आहे.”
“प्रत्यक्षात १ टक्क्यापर्यंत जैविक इंधनावर चालणारे हे पहिले देशांतर्ग व्यावयासिक प्रवाशी उड्डाण असेल. २०२५ पर्यंत आम्ही जेट इंधनामध्ये १ टक्का जैविक मिश्रित करण्याचे लक्ष्य ठेवले, तर भारताला सुमारे १४ कोटी लिटर जैविक इंधन वर्षाकाठी आवश्यक असेल. अधिक महत्त्वाकांक्षीपणे, जर आम्ही ५ टक्यापर्यंत जैविक इंधानाचे लक्ष्य ठेवले तर भारताला सुमारे ७० कोटी लिटरची आवश्यक असेल”, असेही मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी यावेळी सांगितले.