स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग; कर्मचारयांकडून प्रसंगवधान राखत आग विझवण्याचे प्रयत्न

पुण्यातील स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ०९ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता स्वारगेट बस डेपो वर्कशॉप येथील आवारात पीएमपीएमएल बसने पेट घेतल्याची वर्दि प्राप्त होताच अग्निशमन मुख्यालयातील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते.

पुणे : पुण्यातील स्वारगेट डेपो येथे पीएमपीएमएल बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ०९ नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ वाजता स्वारगेट बस डेपो वर्कशॉप येथील आवारात पीएमपीएमएल बसने पेट घेतल्याची वर्दि प्राप्त होताच अग्निशमन मुख्यालयातील अग्निशमन वाहन रवाना करण्यात आले होते. 

घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिले की, बसच्या पुढच्या बाजूने अधिक प्रमाणात पेट घेतला होता. जवानांनी लगेच चारही बाजूने पाण्याचा मारा करीत सुमारे दहा मिनिटात आग पुर्ण विझवत पुढील धोका दूर केला. सदर आगीमध्ये बसचे बरेच नुकसान झाले असून आगीचे कारण समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी नाही.

तसेच या घटनेवेळी पीएमपीएमएलच्या कर्मचारयांकडून प्रसंगावधान राखत अग्निशमन दलाकडून विविध ठिकाणी देण्यात येणारी व्याख्याने व प्रात्यक्षिके याचा मोठा फायदा तर झालाच पण आगीविषयक सुरक्षा व उपाययोजना याचे प्रशिक्षण घेतल्यामुळे आज अग्निरोधक उपकरण (फायर एक्स्टिंग्युशर) वापरुन प्राथमिक स्वरुपात आगीवर नियंञण मिळवता आले अशी भावना व्यक्त करीत अग्निशमन दलाचे आभार मानले.

या कामगिरीत प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रशांत गायकर, वाहनचालक अतुल मोहिते व फायरमन चंद्रकांत गावडे, आजीम शेख, सागर ठोंबरे, मयुर ठुबे, तुषार जानकर यांनी सहभाग घेतला.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest