पुणे : सिद्धार्थ शिरोळे यांना औंध भागातील युवकांचा वाढता पाठींबा

छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना मतदार संघातील सर्वच भागात मोठा पाठींबा मिळत असून पदयात्रा, महिला मेळावे, विविध मंडळांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यावर त्यांचा मोठा भर आहे.

Siddharth Shirole

पुणे : सिद्धार्थ शिरोळे यांना औंध भागातील युवकांचा वाढता पाठींबा

शिरोळे यांचा विविध मंडळातील कार्यकर्त्यांशी, नागरिकांशी प्रत्यक्ष भेटीचा धडाका

पुणे : छत्रपती शिवाजीनगर मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना मतदार संघातील सर्वच भागात मोठा पाठींबा मिळत असून पदयात्रा, महिला मेळावे, विविध मंडळांच्या व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी यावर त्यांचा मोठा भर आहे.

नुकताच औंधरोड भागातील सर्व मंडळातील युवकांच्या सोबत शिरोळे यांची बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित युवकांनी या भागात शिरोळे यांनी केलेल्या विविध विकास कामांचे कौतुक केलेच शिवाय नजीकच्या भविष्यात करावयाची आवश्यक कामे यांची माहितीही त्यांना दिली. याशिवाय औंध भागातील कॉसमॉस बँक चौक, जयभवानी चौक, कोळी आळी, भैरवनाथ मंदिर, मंगेश सोसायटी या भागात देखील शिरोळे यांच्या पदयात्रेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.    

यावेळी बोलताना सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, “औंध भाग हा माझ्या मतदार संघातील महत्त्वाचा भाग असून आजवर या भागातील विविध कामांवर तब्बल ७ कोटी रुपये खर्च केलेले आहेत. या अंतर्गत ड्रेनेज व्यवस्था, रस्ता कॉंक्रीटीकरण, ओपन जीमची उभारणी, व्यायाम साहित्य, पेव्हिंग ब्लॉक्स टाकणे अशी महत्त्वाची कामे झाली आहेत. नजीकच्या भविष्यातही या भागातील उर्वरित कामे मार्गी लावू.”

यावेळी उपस्थित सर्व मंडळाच्या प्रतिनिधींनी औंधरोड भागातील युवकांच्या रोजगाराच्या समस्या मांडल्या तसेच सेवा वस्त्यांमधील वाढती गुन्हेगारी व व्यसनांचे प्रमाण कमी करण्यासाठी एकत्रितपणे मोठ्या प्रमाणात काम करण्याबाबद्दल शिरोळे यांसोबत युवकही कटिबद्ध असतील असे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाला सिद्धार्थ महासंघाचे अध्यक्ष सुभाष पाडळे, चंद्रमणी संघ अखिल औंधरोडचे अभिजित शेलार, तसेच राजू मोरे, साहिल डोळस, युवाशक्तीचे ॲड. रोहित आगळे, चिखलवाडी भागातून अमन भालेराव व औंधरोड परिसरातील राहुल खरात, हरिकृष्ण पटेल, इतर सर्व मंडळाचे व स्पोर्ट्स क्लबचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest