पुण्यात टोळक्यांचा हौदोस सुरूच, तळजाईतील तीस वाहनांची तोडफोड

वारजे परिसरातील गाड्यांची कोयता गॅंगने तोडफोड केली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी कोयता गॅंगकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आला आहे. टोळक्यांनी पुण्यातील तळजाई जवळील वनशिव झोपडपट्टी परिसरात रिक्षासह तीस गाड्यांची तोडफोड केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 20 Jun 2023
  • 10:28 am
पुण्यात टोळक्यांचा हौदोस सुरूच, तळजाईतील तीस वाहनांची तोडफोड

पुण्यात टोळक्यांचा हौदोस सुरूच, तळजाईतील तीस वाहनांची तोडफोड

सलग दुसऱ्या दिवशी तोडफोड झाल्याने भितीचे वातावरण

पुण्यात टोळक्यांचा धुडगुस सुरूच आहे. रविवारी मध्यरात्री वारजे परिसरातील गाड्यांची कोयता गॅंगने तोडफोड केली होती. आता सलग दुसऱ्या दिवशी कोयता गॅंगकडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आला आहे. टोळक्यांनी पुण्यातील तळजाई जवळील वनशिव झोपडपट्टी परिसरात रिक्षासह तीस गाड्यांची तोडफोड केली आहे. त्यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. पोलीसांचा गुन्हेगारांवर धाक राहिला नाही का ? असा प्रश्ना निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळजाई परिसरात सहा जणांच्या टोळके तोंडाला रुमाला बांधून आले होते. हातामध्ये धारदार शस्त्रे घेतलेल्या टोळक्याने रस्त्याच्याकडेला लावलेल्या रिक्षा आणि इतर तीस वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. याबरोबरच टोळक्याने आरडा-ओरडा करत परिसरामध्ये दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, रविवारी मध्यरात्री वारजे परिसरात कोयता गँगने धुडगुस घातला होता. यामध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले होते. त्यातच आता सलग दुसऱ्या दिवशीही तोडफोड सत्र समोर आले आहे. सध्या सहकारनगर पोलीसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, किरकोळ कारणांवरून होणाऱ्या वादातून थेट तोडफोड होत असल्याने सामान्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे पोलिसांचा सराईत गुन्हेगारांवर धाक नसल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest