गणेशोत्सव : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा ठरला

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा ठरला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यावर्षी अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 21 Jun 2023
  • 01:52 pm
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा ठरला

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा ठरला

गणेशोत्सवात उभारण्यात येणार अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती

यंदाच्या गणेशोत्सवाला अवघे तीन महिने उरले आहेत. त्यामुळे, पुण्यातील गणेस मंडळांकडून देखाव्याची जय्यत तयारी करण्यात येत आहे. अशातच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा यंदाचा देखावा ठरला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट यावर्षी अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारणार आहे. मुंबईतील अमन विधाते यांच्या संकल्पनेतून हा देखावा उभारण्यात येणार आहे.

भारतातल्या प्राचीन मंदिराचे देखावे उभारणे हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे वैशिष्ट्य आहे. ज्या लोकांना दूरवरच्या तीर्थक्षेत्राला जाणे होत नाही, त्या लोकांना ती मंदिर बघायला मिळावीत हा मंडळाचा उद्देश असतो. गतवर्षी ट्रस्टच्या वतीने भगवान शिवशंकरांचे निवासस्थान असलेल्या हिमालयाच्या सानिध्यात श्रीपंचकेदार मंदिर साकारण्यात आले होते.

त्यामुळे यंदा देखील दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने आपली परंपरा कायम ठेवली आहे. यंदा ट्रस्टतर्फे गणेशोत्सवात अयोध्येच्या राम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येणार आहे. याबाबत माहिती देताना अमन विधाते म्हणाले की, मी स्वत:हा अयोध्येला दोन वेळा जाऊन आले आहे. तसेच ऑनलाईन माध्यमांवर देखील मोठ्या प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. याचा आधार घेऊन मी राम मंदिराची प्रतिकृती उभारणार आहे. हा देखावा उभारण्याची संधी मला मिळाली, हे माझे भाग्यच आहे. राम मंदीराचा जो अनुभव आहे तो पुण्याच्या पुण्यनगरीत लोकांना अधिक अनुभवाता यावा, हा यामागचा उद्देश आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest