दिवे घाटात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात टँकरने दोन दुचाकींना धडक देऊन दरीत कोसळला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Tue, 9 May 2023
  • 10:34 am
दिवे घाटात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

दिवे घाटात भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू

दुचाकींना धडक देऊन टँकर दरीत कोसळला

पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटात टँकरने दोन दुचाकींना धडक देऊन दरीत कोसळला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक दारू वाहतूक करणारा टँकर हडपसर येथील एका कंपनीकडे जात होता. पुणे-सासवड मार्गावरील दिवे घाटाच्या उतारावर टँकर चालकाचे नियंत्रण सुटल्याचा संशय आहे. त्यामुळे टँकरने समोरून येणाऱ्या दोन दुचाकींना धडक दिली. दुचाकींना धडक बसताच टँकर सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळला.

या भीषण अपघातात दुचाकवरील दोन जण जागीच ठार झाले आहेत. तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस घटनस्थळी दाखल झाले. त्यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्या, टँकर दरीत कोसळल्याने चालक टँकरच्या कॅबिनमध्ये अडकला होता. पोलीसांनी त्याची सुटका करून रुग्णालयात दाखल केले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest