पुण्यात २५ आणि २६ जून रोजी मुसळधार पाऊस पडणार !

गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत असेलेल्या पुणेकरांची पावसाची प्रतिक्षा आता लवकर संपणार आहे. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात २५ आणि २६ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 23 Jun 2023
  • 11:12 am
पुण्यात २५ आणि २६ जून रोजी मुसळधार पाऊस पडणार !

पुण्यात २५ आणि २६ जून रोजी मुसळधार पाऊस पडणार !

भारतीय हवामान खात्याने वर्तविला अंदाज

गेल्या अनेक दिवसांपासून वाट बघत असेलेल्या पुणेकरांची पावसाची प्रतिक्षा आता लवकर संपणार आहे. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात २५ आणि २६ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, पुणे जिल्ह्यात २५ आणि २६ जून रोजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये डोंगर भागातील अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २४ जून रोजी देखील जिल्ह्यात मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात दरवर्षी जून महिन्यात सरासरी १०० मिलिमीटर पाऊस पडतो. परंतु यावर्षी जून महिन्यात केवळ २०.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मान्सून लाबंणीवर पडल्याने गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना उन्हाचा तडाखा बसत आहे. तसेच तापमानातही वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण आहेत. मात्र, आता नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest