पुण्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

पुढील ४८ तासात पुणे आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच सातारा, कोल्हपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागातही येत्या तीन ते चार दिवसात पाऊस जोर धरणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 6 Jul 2023
  • 02:30 pm
पुण्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

पुण्यात पुढील ४८ तासांत मुसळधार पावसाची शक्यता, अलर्ट जारी

पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी

पुढील ४८ तासात पुणे आणि घाट परिसरात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच सातारा, कोल्हपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागातही येत्या तीन ते चार दिवसात पाऊस जोर धरणार आहे. याबाबत पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी काल (बुधवारी) ट्वीट करून माहिती दिली.

हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रासाठी पुढील तीन ते चार दिवसांसाठी तीव्र पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देत या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस कोसळत असून यापुढेही हवामान खात्याच अंदाज घेऊन कामाचे नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्यटनाच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पुणे पोलीसांसह लोणावळा पोलीस, पुणे ग्रामिण पोलीसांची यंत्रणा सज्ज झाली आहे. सुरक्षिततेचे उपाय आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. याशिवाय, पर्यटन स्थळी गर्दी वाढल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता असते. यासाठी पोलीसांनी ११२ हा हेल्पलाईन नंबर सुरू केला आहे. यावर अडचणीच्या वेळी नागरिक मदत मागू शकतात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest