प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, पुणे-अमरावती एक्स्प्रेसला ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

पुणे ते अमरावती प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, २ जुलैपर्यंत नियोजित असलेली ही गाडी आता २८ व ३० जुलैपर्यंत धावणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 19 Jun 2023
  • 11:12 am
पुणे-अमरावती एक्स्प्रेसला ३० जुलैपर्यंत मुदतवाढ

संग्रहित छायाचित्र

प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेचा निर्णय

पुणे ते अमरावती प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेस रेल्वेला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे, २ जुलैपर्यंत नियोजित असलेली ही गाडी आता २८ व ३० जुलैपर्यंत धावणार आहे. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरु करण्यात आली होती. आठवड्यातून दोन दिवस ही गाडी धावते. गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेस येत्या ३० जून ते ३० जुलैपर्यंत दर शुक्रवार व रविवारी पुणे येथून रात्री १० वाजून ५० मिनिटांनी रवाना होईल. दौंड, कुर्डूवाडी, लातूर, परभणी, हिंगोली या मार्गे ही रेल्वे दुसऱ्या दिवशी (शनिवार व सोमवार) दुपारी २.५५ वाजता अकोला रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे. ५ मिनिटांच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होणार आहे.

तर गाडी क्र. ०१४४० अमरावती-पुणे विशेष एक्स्प्रेस येत्या १ जूलै ते ३१ जुलैपर्यंत दर शनिवार व सोमवारी अमरावतीवरून ७ वाजून ५० मिनिटांनी रवाना होऊन बडनेरा-मूर्तिजापूर मार्गे त्याच दिवशी रात्री २१.२० अकोला स्थानकात दाखल होईल. ही गाडी दुसऱ्या दिवशी (रविवार व मंगळवार) दुपारी ४ वाजून २० मिनिटांनी पुणे रेल्वेस्थानकावर पोहोचणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest