सुवर्णपदक विजेती स्नेहल शिंदेचं पुण्यात जंगी स्वागत, ढोल ताशांच्या गजरात शहरात मिरवणूक
पुण्याच्या लेकीने एशियन गेम्स २०२३ मध्ये भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. स्पर्धेमध्ये पुण्याच्या स्नेहल प्रदीप शिंदे यांनी भारतीय महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू म्हणून सुवर्णपदक मिळवले. यामुळे आज (गुरूवारी) तिची पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून ते खडक पोलीसस्टेशन इथपर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये ढोल ताशांच्या गजरात स्नेहलचे पुण्यात स्वागत करण्यात आले.
चीनमध्ये खेळवल्या गेलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा रविवार म्हणजेच ८ ऑक्टोबर रोजी समारोप करण्यात झाला. भारताने आशियाई स्पर्धांमध्ये शंभरचा आकडा पार केला. दरम्यान या स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यामध्ये १०७ पदकं जमा झाली. यामध्ये २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४१ कांस्य पदकांचा समावेश आहे. समारोपानंतर भारतीय खेळाडू मायदेशी आली आहेत. आशिया क्रिडा स्पर्धेमध्ये भारताच्या महिला कबड्डीपटूंनी दमदार कामगिरी केली अन् गोल्ड मेडल पटकावले. या संघात पुण्याची कबड्डीपटू स्नेहल शिंदे हिचा देखील समावेश होता. स्नेहल शिंदे जेव्हा पुण्यात आली तेव्हा तिचे दमदार स्वागत करण्यात आले.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेची स्नेहल शिंदे दगडूशेठ गणपती चरणी लीन झाली. स्नेहल श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेत आरतीदेखील केली आहे. मंदिरापासून स्नेहलची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार रविंद्र धंगेकर उपस्थित होते. स्नेहन शिंदेंचं कुटुंबियांचादेखील धंगेकरांनी सत्कार केला.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.