पुण्यातील घाट भागात गेल्या चोवीस तासात १४२ मिमी पावसाची नोंद

गेल्या २४ तासात पुण्यातील तामिनी घाट परिसरात सर्वाधिक १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर डोंगरवाडी परिसरात १३० मिमी आणि धावडी परिसरात ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 30 Jun 2023
  • 11:44 am
पुण्यातील घाट भागात गेल्या चोवीस तासात १४२ मिमी पावसाची नोंद

पुण्यातील घाट भागात गेल्या चोवीस तासात १४२ मिमी पावसाची नोंद

पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

पुणे शहरात आजूबाजूच्या परिसरात गुरूवारी मुसळधार पाऊस पडला. शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पाऊस सुरू आहे. मागिल काही दिवसांपासून राज्यभरासह पुण्यात पावसाची रिप रिप सुरू आहे. गेल्या २४ तासात पुण्यातील तामिनी घाट परिसरात सर्वाधिक १४२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर डोंगरवाडी परिसरात १३० मिमी आणि धावडी परिसरात ११३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासात लवासामध्ये ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर निमगिरीमध्ये ५७.५ मिमी, लोणावळामध्ये ८९ मिमी, पाषाणमध्ये मिमी, शिवाजीनगरमध्ये ५.९ मिमी, वडगावशेरीमध्ये ३.५ मिमी, हडपसरमध्ये मिमी तर तळेगावमध्ये १७.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

घाट भागात पावसाचा जोर वाढल्याने काही प्रमाणात धरणाच्या साठ्यात देखील वाढ झाली आहे. दरम्यान, पुणे शहरात पुढील काही तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. शहरात मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. यामुळे रस्त्यांवर देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचण्याची शक्यता आहे. तसेच येत्या काही दिवसात लगतच्या घाट भागात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. कारण घाट भागात अतिमुसळधार पावसासोबतच सोसाट्याचे वारे वाहतील. यामुळे झाडे देखील उन्मळून पडू शकतात. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest