चांदणी चौकातील पादचारी मार्गासाठी २५ कोटींचा प्रस्ताव
पुण्यातील चांदणी चौकात कोट्यवधी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेल्या पुलाची भुलभुलैया सारखी परिस्थिती झाली आहे. सातत्याने सुरू असलेली वाहतूक कोंडी आणि अपुरे पादचारी मार्ग यासाठी नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. त्यामुळे, अखेर आता महापालिकेने पादचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करून त्या दूर करण्यासाठी आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये चार किलोमीटर लांबीचा पादचारी मार्ग निर्माण करणे, पादचारी पूल उभारला जाणार आहे.
महापालिकेकडून आखण्यात आलेल्या पादचारी मार्गाच्या आराखड्याच्या अंदाजानुसार किमान २५ कोटी रुपये खर्च असणार आहे. महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. मात्र नागरिकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी बरेच अंतर चालावे लागते. महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उड्डाणपुलासोबत पादचाऱ्यांसाठी व्यवस्था करावी अशी मागणी यापूर्वी देखील केली जात होती. पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.
पुण्यातील चांदणी चौकात बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलाचा प्रकल्प तब्बल ३९७ कोटी रुपयांचा आहे. १ ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नव्या उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर चांदणी चौकातील वाहतूक कोंडी फुटेल अशी अपेक्षा होती. मात्र वाहतूक कोंडी जेसे थेच दिसत आहे. वाहतूक कोंडी होण्यामागची काही प्रमुख कारणं समोर आली आहे. चांदणी चौकातील पुलाची चुकलेली रचना, खडलेली कामे, भुसारी कॉलनी ते मुळशीकडे जाणाऱ्या भुयारी मार्गाचे काम आता सुरु करण्यात आले.
मुख्य म्हणजे पादचाऱ्यांची होणारी गैरसोय पाहून महापालिकेने नवा आराखडा तयार केला आहे. आराखड्याच्या अंदाजानुसार किमान २५ कोटी रुपये खर्च असणार आहे. महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) यांच्यामध्ये संयुक्त बैठक झाल्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. त्यानंतर पादचाऱ्यांची भुलभुलैयामधून सुटका होईल, अशी अपेक्षा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.