खडकवासलामध्ये महिन्याभरात चौघांचा बुडून मृत्यू, रुपाली चाकणकरांकडून उपायोजनांची मागणी

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या कालव्यात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या ४ दुर्दैवी घटना गेल्या महिन्याभरात घडल्या आहेत. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 15 Jun 2023
  • 11:08 am
खडकवासलामध्ये महिन्याभरात चौघांचा बुडून मृत्यू

खडकवासलामध्ये महिन्याभरात चौघांचा बुडून मृत्यू

पत्र व्यवहारानंतरही जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाकडून कोणताच प्रतिसाद नाही

पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरणाच्या कालव्यात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या ४ दुर्दैवी घटना गेल्या महिन्याभरात घडल्या आहेत. याबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर उपाययोजना करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र, अद्यापही राज्य महिला आयोगाच्या पत्राला जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद अथवा उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा एकदा पत्राद्वारे घटनास्थळाची पाहणी करून उपाययोजन कराव्यात अशी मागणी रुपाली चाकणकर यांनी केली आहे.

खडकवासला धरणात पोहण्यासाठी अनेक पर्यटक जात असतात. मात्र, पाण्याचा अंदाज न लागल्यामुळे अनेकांचा बुडून मृत्यू होतो. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्यामुळे राज्य महिला आयोगाने याची गंभीर दखल घेतली होती. त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी २५ मे रोजी जलसंपदा विभाग आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे धरणाची पाहणी करावी, अशी मागणी केली होती. तसचे २५ मे रोजी होणाऱ्या बैठकीत याबाबत उपाययोजना करण्याची देखील मागणी केली होती. मात्र, याबाबत जिल्हाधिकारी आणि जलसंपदा विभागाकडून पाहणी दौरा करण्यात आलेला नाही.

त्यामुळे रुपाली चाकणकर यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत म्हटले की, मी २४ मे रोजीच जिल्हाधिकारी पुणे यांना धरण परिसरात पाहणी करून या परिसरात दुर्घटना न होण्यासाठी उपाययोजना करणेबाबत पत्रव्यवहार केला होता. परंतु यावेळी राज्यपाल आणि मंत्र्यांच्या दौऱ्यांमुळे जिल्हाधिकाऱ्यांना खडकवासला धरणाचा पाहणी दौरा करणे शक्य झाले नाही. जर वेळीच यावर उपाययोजना करण्यात आल्या असत्या तर या दुर्घटना टाळता आल्या असत्या. माझी जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागास विनंती आहे की, याबाबत तातडीने पाहणी करून उपाययोजना करण्यात याव्यात.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest