जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करा, पुणे आरटीओचे आवाहन

जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा. वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Fri, 16 Jun 2023
  • 12:12 pm
animal transport : जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करा, पुणे आरटीओचे आवाहन

संग्रहित छायाचित्र

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आरटीओचे आवाहन

जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी आपल्या वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करावा. वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी स्पष्ट केले आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. त्याअनुषंगाने परिवहन विभागाकडून वाहतूकदारांना दक्षता घेण्याबाबत कळविण्यात आले आहे. जनावरांची वाहतूक करण्यापूर्वी वाहतूकदारांनी केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ नुसार वाहनाच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घेणे बंधनकारक आहे.

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ च्या नियम ९६ मधील तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतूक करताना वाहतूकदाराने सक्षम प्राधिकरण तथा भारतीय प्राणी कल्याण मंडळ व केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी वा व्यक्ती वा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. असे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांच्या वाहतूक करण्यास वाहतूकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.

प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६०, प्राण्यांच्या वाहतूकीचे नियम १९७८ आणि प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत (प्राण्यांची पायी वाहतूक) नियम २००१ या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतूक करण्यात येऊ नये. या तरतुदींचे पालन न केल्यास संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळवले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest