कॅरम खेळण्याच्या वादातून दोन कैद्यांमध्ये हाणामारी, डोक्यात घातला पाटा

मोक्का कारवाईच्या अंतर्गत गजा मारणे या टोळीतील गुंड येरवडा येथील कारागृहात कैद आहेत. बुधवारी रात्री या कैद्यांमध्ये झालेल्या वादामध्ये एका कैद्याने थेट दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात जेवण बनवण्याचा पाटा घातला. यात संबंधित कैदी गंभीर जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Monika Yenpure
  • Fri, 12 May 2023
  • 09:46 am
fight : कॅरम खेळण्याच्या वादातून दोन कैद्यांमध्ये हाणामारी, डोक्यात घातला पाटा

fight : कॅरम खेळण्याच्या वादातून दोन कैद्यांमध्ये हाणामारी, डोक्यात घातला पाटा

मोक्काअंतर्गत न्यायालयीन कोठडीतील कैद्यांमध्ये झाला वाद

मोक्का कारवाईच्या अंतर्गत गजा मारणे या टोळीतील गुंड येरवडा येथील कारागृहात कैद आहेत. बुधवारी रात्री या कैद्यांमध्ये झालेल्या वादामध्ये एका कैद्याने थेट दुसऱ्या कैद्याच्या डोक्यात जेवण बनवण्याचा पाटा घातला. यात संबंधित कैदी गंभीर जखमी झाला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या येरवडा कारागृहातील बराकीत ७०० ते ८०० गुन्हेगार हे मोक्काअंतर्गत न्यायालयीन कोठडीत आहेत. बुधवारी दुपारी कारागृहातील कैदी कॅरम खेळत होते. या दरम्यान, दोन कैद्यांमध्ये आपापसात वाद निर्माण झाला होता. दुपारची वेळ असल्याने सुरक्षारक्षकांचे या कायद्यांकडे लक्ष गेले व त्यांनी ही भांडणे लागलीच सोडवली.

त्यानंतर या सर्वांना पुन्हा एकदा बराकित बंद करण्यात आले होते. मात्र, याच दिवशी रात्री कैदी तपासणी सुरू असताना पुन्हा एकदा या कैद्यांमधील वाद उफाळला. यावेळी एकाने दुसऱ्या टोळीच्या गुंडाच्या डोक्यात पाटा घातल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest