पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन गावाच्या हद्दीत टॅंकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल आहे. या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १६ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झाली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 28 Jun 2023
  • 12:40 pm
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, महिलेचा जागीच मृत्यू

संग्रहित छायाचित्र

शाळकरी मुलगी जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

पुणे-सोलापूर महामार्गावरील उरुळी कांचन गावाच्या हद्दीत टॅंकरने दुचाकीला धडक दिल्याने भीषण अपघात झाल आहे. या अपघातात एका ३५ वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर १६ वर्षीय शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. हा अपघात बुधवारी सकाळी आठच्या सुमारास कुंजीरवाडीजवळ घडला आहे.

योगिता राजकुमार गव्हाणे (वय ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. ती हवेली तालुक्यातील उरुळी कांचन येथील रहेजा कॉम्प्लेक्स येथे राहते. तर सुरेखा राजकुमार गव्हाणे (वय १६) असे जखमी मुलीचे नाव आहे. जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, योगिता या आपली मुलगी सुरेखा सोबत बुधवारी पहाटे स्कूटरवरून शेवाळेवाडीला कामासाठी जात होत्या. सुरेखा आपल्या आईसोबत गाडी चालवत होती. सकाळी आठच्या सुमारास त्या पुण्याच्या दिशेने जात असताना नायगाव चौकाजवळ नायगाव जंक्शनकडून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या डिझेल टँकरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. टँकरने एवढी जोरदार धडक दिली की योगिता यांचा जागीच मृत्यू झाला. तर शाळकरी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे पुणे-सोलापूर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest