पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

मालवाहू ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि त्याच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 15 Jun 2023
  • 03:28 pm
Accident  : पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरची झाली धडक, ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी

मालवाहू ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक आणि त्याच्या पुतण्याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टर चालक किरकोळ जखमी झाला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावरील पाटस येथे गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक भरधाव वेगात पुण्याच्या दिशेने जात होता. यावेळी समोर असलेला उसाचा ट्रॅक्टर रस्ता ओलांडत होता. त्याच क्षणी मालवाहून ट्रक उसाच्या ट्रॅक्टरला धडकला. या अपघातात ट्रक चालक बिभीषण हाके आणि त्याचा पुतण्या वैभव हाके यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टर चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मात्र डॉक्टरांनी बिभीषण आणि त्याच्या पुतण्याला मृत घोषित केले. वैभव अवघा १८ वर्षांचा होता आणि त्याने नुकतीच बारावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली होती. नुकतीच बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest