दशक्रिया विधीसाठी कुटुंबीय बाहेर गेले, चोरट्याने भरदिवसा लांबवले घरातील सोने

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दशक्रिया विधीच्या वेळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून भरदिवसा टोळक्यांनी घरफोडी करत दोन घरातून ८ तोळे सोने लांबवण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी संशयीत चोरट्याला नारायणगाव परिसरातून अटक केली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 8 May 2023
  • 10:47 am
चोरट्यांने भरदिवसा लांबवले घरातील सोने

चोरट्याने भरदिवसा लांबवले घरातील सोने

आरोपीला नारायणगावातून पोलीसांनी केली अटक

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात दशक्रिया विधीच्या वेळी घरातील लोक बाहेर गेल्याची संधी साधून भरदिवसा टोळक्यांनी घरफोडी करत दोन घरातून ८ तोळे सोने लांबवण्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलीसांनी संशयीत चोरट्याला नारायणगाव परिसरातून अटक केली आहे.

आकाश प्रकाश विभुते (वय ३२) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यात दशक्रिया विधीच्या वेळी घरातील लोक बाहेर गेली होती याचाच फायदा घेत चोरट्यांनी दोन घरात घुसून लाखोंचा मुद्देमाल लांबवला होता. याबाबत तपास सुरू असताना खबऱ्यांकडून काही गोपनीय माहिती मिळाली.

या माहितीच्या आधारे आरोपी आकाशला नारायणगाव परिसरातून अटक केली आहे. या आरोपीकडून घरपोडीच्या माध्यमातून चोरी केलेले आठ तोळे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुणात वापरलेली मोटार सायकल असा एकूण ५ लाख ४६ हजार ४८१ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. त्याच्यावर असलेली कलम ४५४, ३८० अशी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच त्याच्यावर सोलापूर जिल्ह्यात सांगोला पोलीस स्टेशनमध्ये देखील कलम ४५४, ३८०, ३४ यासोबतच करंकब पोलीस स्टेशनमध्ये कलम ३८०, ४६१, ३४ या प्रमाणे घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest