पीएमपीएमएलकडून दोन बस मार्गांचा विस्तार, एका बस मार्गात बदल

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) दोन बस मार्गांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. तर एका बस मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर पीएमपीएमएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तरी या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 29 Jun 2023
  • 01:42 pm
पीएमपीएमएलकडून दोन बस मार्गांचा विस्तार, एका बस मार्गात बदल

पीएमपीएमएलकडून दोन बस मार्गांचा विस्तार, एका बस मार्गात बदल

प्रवाशांच्या मागणीनंतर प्रशासनाने घेतला निर्णय

पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपीएमएल) दोन बस मार्गांमध्ये विस्तार करण्यात आला आहे. तर एका बस मार्गामध्ये बदल करण्यात आला आहे. प्रवाशांच्या मागणीनंतर पीएमपीएमएल प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तरी या सेवेचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

यामध्ये बसमार्ग क्र. ३५ अ व १६७ या दोन बसमार्गांचा विस्तार करण्यात आला आहे. बसमार्ग क्र. ३५ अ शिवाजीनगर / सिमला ऑफिस ते डांगे चौक या मार्गाचा विस्तार इंदिरा कॉलेज (ताथवडे) पर्यंत करण्यात आला आहे. तर बसमार्ग क्र. १६७ वाघोली ते हडपसर या मार्गाचा विस्तार भेकराईनगर डेपोपर्यंत करण्यात येत आहे. तसेच बसमार्ग क्र. २७७ - भोसरी ते कोथरूड डेपो या मार्गात बदल करून पिंपळेगुरव, साईचौक व सांगवी मार्गे करण्यात येत आहे. हे सर्व बदल १ जूलैपासून लागू करण्यात येणार आहेत.

बसमार्गांचा तपशील खालीलप्रमाणे

मार्ग क्रमांक ३५ अ - शिवाजीनगर / सिमला ऑफिस ते इंदिरा कॉलेज ( ताथवडे).

> मार्गे - औंधगाव, डांगे चौक, ताथवडेगाव, जे. एस. पी. एम कॉलेज, डी. वाय. पाटील कॉलेज.

बस संख्या - ३.

> वारंवारिता – ५० मिनिटे.

मार्ग क्रमांक १६७ - भेकराईनगर डेपो ते वाघोली.

> मार्गे - मगरपट्टा, मुंढवा व खराडी बायपास.

बस संख्या - १६.

> वारंवारिता - १० मिनिटे.

मार्ग क्रमांक २७७ - भोसरी ते कोथरूड डेपो.

> मार्गे - पिंपळेगुरव, साईचौक व सांगवी.

बस संख्या - ४.

> वारंवारिता - ६० मिनिटे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest