Ashadhi wari : पालखी मार्गांवरील आपतकालीन व्यवस्था वाढवा; महापालिका आयुक्तांकडून दोन्ही मार्गांची पाहणी

यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात सोमवार (१२ जून २०२३) रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी मार्गांची पाहणी केली आहे. पालखी मार्गांच्या पाहणीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून संबंधितांना पालखीच्या आगमनप्रसंगी करावयाच्या नियोजनाबाबत आदेश देण्यात आले.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 24 May 2023
  • 12:22 pm
महापालिका आयुक्तांकडून दोन्ही मार्गांची पाहणी

महापालिका आयुक्तांकडून दोन्ही मार्गांची पाहणी

पुण्यात १२ जून रोजी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे होणार आगमन

यावर्षी श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आगमन पुणे शहरात सोमवार (१२ जून २०२३) रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पालखी मार्गांची पाहणी केली आहे. पालखी मार्गांच्या पाहणीमध्ये विविध विषयांवर चर्चा करून संबंधितांना पालखीच्या आगमनप्रसंगी करावयाच्या नियोजनाबाबत आदेश देण्यात आले.

आयुक्त विक्रम कुमार अधिकाऱ्यांना सुचना देताना म्हणाले की, येरवडा-कळस-धानोरी क्षेत्रीय कार्यालय, औंध-बाणेर क्षेत्रिय कार्यालय, भवानी पेठ क्षेत्रिय कार्यालय या ठिकाणी सुसज्ज आपत्ती व्यवस्थापन कक्ष, रस्ते दुरूस्ती, अतिक्रमण, मुक्कामाच्या ठिकाणाची सुरक्षितता, पाणीपुरवठा, स्वच्छतागृहे, आरोग्यविषयक सेवा या सोयी-सुविधा उपलब्ध करणे, पावसाळी गटारे, चेंबर्स दुरुस्त करा तसेच स्वच्छता विषयक कामे करा. रस्त्यावरील बेवारस गाड्या आणि अडगळीच्या वस्तू उचलून त्यांची विल्हेवाट लावा. याशिवाय, पालखी मार्गावरील अतिक्रमणे काढून टाका.

उन्हाची तीव्रता लक्षात घेवून आपतकालीन कक्षांची संख्या वाढवा. पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकऱ्यांसाठी विसावा/आराम कक्षदेखील उभारण्याची व्यवस्था करा. सदर कक्षांमध्ये वारकऱ्यांसाठी ओ. आर. एसची पाकिटे, स्वच्छ पिण्याचे पाणी, पंखे, मोबाईल टॉयलेट्स, इमर्जन्सी मेडिकल युनिट इत्यादी गोष्टींची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ठिकठिकाणी वारकऱ्यांचे आरोग्यविषयक सेवा उपलब्ध होणेकामी फिरते दवाखान्यांची आणि मोबाईल टॉयलेटची व्यवस्था करा, अशा सुचनाही आयुक्तांनी दिल्या आहेत.

पुढे विक्रम कुमार म्हणाले की, वाहतूक पोलीसांमार्फत वाहतूक सुरळीत रहावी तसेच पालखी दिंडी सोहळ्यास वाहतुकीचा अडथळा होणार नाही याची काळजी घ्या. सुरक्षेच्या कारणास्तव भवानी पेठेतील मंडपांमध्ये विसाव्याच्या ठिकाणीं सी. सी. टि. व्ही. लावा. पथ विभागाच्या माध्यमातून पदपथ व रस्ते यांची डागडुजी करा. त्याच बरोबर रस्त्यालगतच्या सिमाभिंती रंगविण्यात येणार आहे. पालखी मार्गात अडथळा येणाऱ्या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यात येणार आहे.

विसाव्याचा ठिकाणी पालखीचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी आणि गेरसोय होऊ नये याकरिता पालखी दर्शन व्यवस्था व बॅरिकेडस बाबत संबंधितांना आदेश दिले. त्याचबरोबर विसाव्याच्या ठिकाणी प्रसादाची व्यवस्था करताना आपत्तीजन्य परिस्थिती उद्भवू नये याकरिता अग्निशमनविषयक सुविधा देण्यास आयुक्त विक्रम कुमार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest