सिंहगड किल्ल्यावर ई-बस पुन्हा सुरू होणार !

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) आता पुणेकरांची गडावर गर्दी पाहता पुन्हा एकदा सिंहगड किल्ल्यावर ईलेक्ट्रीक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यासाठी पीएमपीएमएलने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे वनविभागासह संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Wed, 14 Jun 2023
  • 02:36 pm
सिंहगड किल्ल्यावर ई-बस पुन्हा सुरू होणार !

सिंहगड किल्ल्यावर ई-बस पुन्हा सुरू होणार !

मे महिन्यात १५ दिवसांतच झाली होती बंद

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) आता पुणेकरांची गडावर गर्दी पाहता पुन्हा एकदा सिंहगड किल्ल्यावर ईलेक्ट्रीक बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पावसाळ्यासाठी पीएमपीएमएलने वनविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे वनविभागासह संयुक्त सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सिंहगड किल्ल्यावरील इलेक्ट्रिक बससेवा गेल्या मे महिन्यात सुरू करण्यात आली होती. मात्र, पुढील १५ दिवसांतच बंद करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा एकदा बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यापुढे सात मध्यम आकाराच्या ई-बस ताफ्यात समाविष्ट करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) ओम प्रकाश बकोरिया म्हणाले, "आमची वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम वन विभागाच्या अधिकाऱ्यांसह सिंहगड किल्ला घाट विभागाला भेट देणार आहे; ते घाट रस्त्याची आणि बस वाहतुकीची एकूण सुरक्षा व्यवस्था पाहणार आहेत. घाटात एक विशिष्ट जागा आहे जिथे अपघाताच्या शक्यतेसाठी वक्रता तपासणे आवश्यक आहे. आमचे नागरी, यांत्रिक आणि मुख्य वाहतूक व्यवस्थापक या रस्त्याची तपासणी करणार आहेत आणि ते सविस्तर अहवाल सादर करणार आहेत. आम्ही चर्चा केलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बसेसची लांबी कमी करणे, पूर्वी बसेस नऊ मीटर लांब होत्या. आम्ही आता सेवेसाठी सात मीटर लांबीच्या मिडी बसेसची योजना आखत आहोत. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर आणि अहवाल सादर झाल्यानंतर, आम्ही सेवा पुन्हा सुरू करण्यावर काम करू."

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest