झाडाची वाळलेली फांदी वीजवाहिनीवर पडल्याने शॉर्टसर्किट, कोथरूडमधील वीजपुरवठा खंडीत

पुण्यातील कोथरूड परिसरात एका झाडाची वाळलेली फांदी २२ केव्ही सौदामिनी वीजवाहिनीवर पडली. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन या फांदीने पेट घेतल्याची घटना घडली.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 26 Jun 2023
  • 12:19 pm
 shot circuit : झाडाची वाळलेली फांदी वीजवाहिनीवर पडल्याने शॉटसर्किट

झाडाची वाळलेली फांदी वीजवाहिनीवर पडल्याने शॉर्टसर्किट

फांदी वीजवाहिनीवर पडल्याने घेतला पेट

पुण्यातील कोथरूड परिसरात एका झाडाची वाळलेली फांदी २२ केव्ही सौदामिनी वीजवाहिनीवर पडली. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन या फांदीने पेट घेतल्याची घटना घडली. ही घटना कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनीत शनिवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. यामुळे परिसरातील वीजपुरवठा खंडीत झाला होता.

यंदा मान्सूनचे गेल्या वर्षीच्या तुलनेत १० ते १५ दिवस उशिराने आगमन झाले आहे. यामुळे पाण्याच्या कमतरतेमुळे शहरासह परिसरातील झाडे वाळत होती. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. पावसात वाहणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अशाच एका वाळलेल्या झाडाची फांदी पडल्याची घडना घडली.

कोथरूडमथध्ये उजवी भुसारी कॉलनीत शनिवारी रात्री ७ वाजून २० मिनिटांच्या आसपास एका झाडाची वाळलेली फांदी २२ केव्ही सौदामिनी वीजवाहिनीवर पडली. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन या फांदीने पेट घेतला. यामुळे भुसारी कॉलनीमधील वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन फांदी हटविली आणि रात्री ८ वाजता वीजपुरवठा सुरळीत केला. दरम्यान, यावर कायमस्वरुपी उपाययोजना म्हणून महावितरणकडून या ठिकाणच्या वीजवाहिनीचा सुमारे २०० मीटरचा भाग हा प्राधान्याने व त्यानंतर उर्वरित वीजवाहिनी देखील भूमिगत करण्यात येणार आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest