डेक्कन : नो पार्किंग झोनमधील कारवाईदरम्यान पोलीसांना सापडली चोरीला गेलेली दुचाकी

पुण्यातील डेक्कन परिसरात नो पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई करत असताना वाहतूक पोलीसांना चोरीला गेलेली दुचाकी सापडल्याचे समोर आले आहे. ही दुचाकी चिखली परिसरातून चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिच गुन्हा दाखल केला होता.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 22 May 2023
  • 05:59 pm
नो पार्किंग झोनमधील कारवाईदरम्यान पोलीसांना सापडली चोरीला गेलेली दुचाकी

नो पार्किंग झोनमधील कारवाईदरम्यान पोलीसांना सापडली चोरीला गेलेली दुचाकी

डेक्कन पोलीसांनी दुचाकी दिली चिखली पोलीसांच्या ताब्यात

पुण्यातील डेक्कन परिसरात नो पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई करत असताना वाहतूक पोलीसांना चोरीला गेलेली दुचाकी सापडल्याचे समोर आले आहे. ही दुचाकी चिखली परिसरातून चोरीला गेल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिच गुन्हा दाखल केला होता.

डेक्कन वाहतूक विभागाच्या हद्दीत नो पार्किंग झोनमधील वाहनांवर कारवाई सुरू होती. या कारवाईत एमएच १४ जीएफ ७५१८ नंबरची होंडा युनिकॉर्न ही दुचाकी पोलीसांनी उचलली होती. या दुचाकीची चौकशी केली असता ही दुचाकी या आधीच चोरीला गेल्याचे उघड झाले.

याबाबत चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता डेक्कन परिसरात ही दुचाकी सापडली आहे. त्यामुळे डेक्कन वाहतूक पोलीसांनी ही दुचाकीच्या पुढील कारवाईसाठी चिखली पोलीसांच्या ताब्यात देण्यात आली आहे. चिखली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest