Congress : रॅिगंग आणि आत्महत्या प्रकरणात काँग्रेसची उडी

शहरातील राज गर्जे आत्महत्या प्रकरणात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता अतुल लोंढे यांनी तपासाची मागणी केल्यामुळे तपासाला वेग येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Super Admin
  • Mon, 22 May 2023
  • 10:42 am
रॅिगंग आणि आत्महत्या प्रकरणात काँग्रेसची उडी

रॅिगंग आणि आत्महत्या प्रकरणात काँग्रेसची उडी

प्रकरणाची चौकशी झाली नाही तर काँग्रेसचा रस्त्यावर उतरण्याचा इशारा

#चतुःश्रृंगी

शहरातील राज गर्जे आत्महत्या प्रकरणात आता काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्वीट करत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर आता अतुल लोंढे यांनी तपासाची मागणी केल्यामुळे तपासाला वेग येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुण्यातील नामांकित कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याने रॅगिंगला वैतागून आत्महत्या केली होती. राज रावसाहेब गर्जे असे या २२ वर्षीय तरुणाचे नाव होते. राज याने मध्यस्थीने जोशी याला काही पैसे उसने घेऊन दिले होते. परंतु, ते पैसे जोशी परत देत नव्हता. त्यामुळे राज मानसिक तणावात आला होता. या तणावातून राजने १० मे रोजी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. निरुपम जयवंत जोशी याच्याविरुध्द आत्महत्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजचे वडील रावसाहेब प्रल्हाद गर्जे  यांनी चतुःश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली होती. दरम्यान लोंढे यांनी ट्वीट करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, पुण्यातील राज गर्जे याच्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट उल्लेख असूनदेखील अद्याप या प्रकरणी जोशी नामक व्यक्तीला १२ दिवसांनंतरही अटक का नाही? देवेंद्र फडणवीस आपण याची गंभीर दखल घेऊन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत. मृत्यूनंतर तरी त्याला न्याय मिळावा. विलंब करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांचे तत्काळ निलंबन करावे अन्यथा या विरुद्ध काँग्रेस आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे. कारण या प्रकरणी  पोलिसांवर राजकीय दबाव टाकण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

याच प्रकरणात यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील उडी घेतली होती. त्यांनी या गरिबाला न्याय द्या, अशी मागणी केली होती.  मराठवाडा मित्र मंडळाच्या कॉलेजमध्ये तिसर्‍या वर्षात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्याने राहात असलेल्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील सगळे फरार आहेत.

feedback@civicmirror.in

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest