सीबीएसई तायक्वांदो स्पर्धेत बालेवाडीतील सीएम इंटरनॅशनल शाळेला घवघवीत यश
कर्नाटक बेळगाव येथे सीबीएसई तायक्वांदो झोनल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत बालेवाडीतील सीएम इंटरनॅशनल शाळेतील इयत्ता सातवीच्या मृण्मयी सोनईकरने १४ वर्षांखालील मुली - ४४ किलो गटात कांस्यपदक पटकावले. तर इयत्ता ९वीच्या आरुष एककरने १७ वर्षांखालील मुले - ६३ किलो गटात रौप्यपदक पटकावले.
तसेच आरुष एक्करने झोनमध्ये रौप्य पदक जिंकून सीबीएसई राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे. महाराष्ट्र, गोवा, दमण आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, कर्नाटक, केरळ यासारख्या विविध राज्यांतील ५००० हून अधिक स्पर्धकांनी विविध वयोगटांमध्ये भाग घेतला. एसकेपी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणपतराव बालवडकर, सचिव डॉ. सागर बालवडकर, प्राचार्य इकबाल कौर राणा यांनी खेळाडूंचे कौतूक केले.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.