पुण्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आता पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 26 Jun 2023
  • 11:35 am
पुण्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

पुण्यात पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात पावसाने लावली हजेरी

गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. आता पुढील दोन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे.

दरवर्षीच्या तुलनेत यंदा मान्सून उशिरा दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते. आता गेल्या दोन दिवसांपासून पुण्यासह आजूबाजूच्या परिसरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस पुण्यातील घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे रहिवाशांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या २४ तासात शिवाजीनगर परिसरात ११ मिलीमिटर पावसाची नोंद झाली. तर ढमढरेमध्ये ११.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच पाषाण परिसरात ११.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. तर लोणावळ्यात ९३.५ आणि लवासामध्ये ५३.५ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest