लाचखोर अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन

पुण्यातील महसूल विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ९ जून रोजी त्यांना सीबीआयने अटक केली होती. सध्या त्यांचा मुक्काम येरवडा जेलमध्ये आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 22 Jun 2023
  • 12:20 pm
लाचखोर अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन

लाचखोर अधिकारी डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन

९ जून रोजी सीबीआयने केली होती अटक

पुण्यातील महसूल विभागाचे अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचे अखेर निलंबन करण्यात आले आहे. ८ लाख रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ९ जून रोजी त्यांना सीबीआयने अटक केली होती. सध्या त्यांचा मुक्काम येरवडा जेलमध्ये आहे.

निलंबनाच्या अहवालात, रामोड यांनी पुणे मुख्यालय सोडून जाता कामा नये. तसेच खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करता कामा नये. विभागीय आयुक्तांची परवानगी न घेता पुणे शहर सोडू नये, पुढील आदेश येईपर्यंत निलंबन असेल, असे आदेशात म्हटले आहे. रामोड यांनी पुणे-सोलापूर महामार्गावरील जमीनीच्या व्यवहारात एक शेतकऱ्याकडून ८ लाख रुपये लाच स्वीकारली होती. या प्रकरणी रामोड यांनी सीबीआयने ९ जून रोजी अटक केली. त्यानंतर पुणे विशेष न्यायालयात हजर केल्यानंतर रामोड यांना न्यायालयाने १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली होती.

सीबीआय कोठडी संपुष्टात आल्यानंतर रामोड यांनी पुण्यातील येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. या दरम्यान, सीबीआयने त्यांच्या कार्यालयासह बाणेर आणि नांदेड येथील घरांवर छापे टाकले होते. सीबीआयने छापा टाकल्यानंतर रामोड यांच्याकडे तब्बल सहा कोटी रुपयांची रोकड आणि बेहिशेबी मालमत्तेची कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता. अखेर राज्य सरकाने याला मंजूरी दिल्यामुळे रामोड यांचे पुढील आदेश येईपर्यंत निलंबन करण्यात आले आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest