पुणे विद्यापीठाची मोठी झेप, आशिया विद्यापीठ क्रमवारीत मिळाले १९० वे स्थान

टाइम्स हायर एज्युकेशन विद्यापीठ क्रमवारी २०२३ जाहीर झाले आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आशिया विद्यापीठ क्रमवारीमध्ये वाढ होऊन १९० व्या स्थानी पोहोचले आहे. मागील वर्षी हे स्थान २०१ ते २५० असे होते.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Sat, 24 Jun 2023
  • 12:53 pm
 Asia University ranking : पुणे विद्यापीठाची मोठी झेप, आशिया विद्यापीठ क्रमवारीत मिळाले १९० वे स्थान

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

गेल्या वर्षी क्रमवारी पुणे विद्यापीठ होते २०१ ते २५० व्या स्थानी

टाइम्स हायर एज्युकेशन विद्यापीठ क्रमवारी २०२३ जाहीर झाले आहे. यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठी झेप घेतली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची आशिया विद्यापीठ क्रमवारीमध्ये वाढ होऊन १९० व्या स्थानी पोहोचले आहे. मागील वर्षी हे स्थान २०१ ते २५० असे होते.

टाइम्स हायर एज्युकेशन विद्यापीठकडून दरवर्षी विद्यापीठाची क्रमवारी जाहीर करण्यात येते. यदा जाहीर करण्यात आलेल्या क्रमावारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची जागतिक क्रमवारी लाक्षणियरित्या सुधारली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला क्रमवारीमध्ये यंदा १९० वे स्था मिळाले आहे. २०२२ मध्ये हे स्थान २०१ ते २५० असे होते.

तर जागतिक विद्यापीठ क्रमवारी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ २०२२ ला ८०१ ते १००० स्थानामध्ये होते. यावर्षी २०२३ ला विद्यापीठाने ६०१ ते ८०० च्या दरम्यान स्थान मिळविले आहे. दरम्यान, विद्यापीठाची क्रमवारी ही डेटा पॉइंट्स (मापदंड) आणि सामान्यीकरण धोरणांवर अवलंबून असते. यामध्ये विविध रँकिंग एजन्सी वेगवेगळे पॅरामीटर्स आणि प्रक्रिया वापरतात. मात्र, पुणे विद्यापीठाच्या क्रमवारीत आणखी सुधारणा करण्यासाठी संशोधनात सुधारणा करणे आवश्यक आहे.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest