बना जबाबदार पुणेकर!
देशभर प्रसिद्ध असलेल्या पुण्यातील वाहतूक समस्येबाबत नागरिकांमध्ये जाणिवेचे वातावरण तयार व्हावे म्हणून सोशल मीडियावर अनेक नागरिक काम करत असतात. त्याचबरोबर शहराच्या विविध भागात नागरिक उत्स्फूर्तपणे गटागटाने किंवा व्यक्तिगत पातळीवर कार्यरत असतात. असे पुणेकर आता ‘सीविक मिरर’ आणि ‘पुणे टाइम्स मिरर’ ने पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने हाती घेतलेल्या ‘जरा देख के चलो’ या उपक्रमात सहभागी होत आहेत.
‘हेल्प रायडर्स’ या स्वयंसेवी संस्थेचे सदस्य प्रशांत कांबळे, सुरज पोतदार, बाळासाहेब ढमाले, भारत मिसाळ यांनी पुणे शहर वाहतूक पोलिसांच्या खांद्याला खांद्या लावून काम करायचे ठरवले ते वाहतूक व्यवस्थेत काही प्रमाणात बदल करण्याच्या उद्दिष्टाने. वाहनांच्या कोंडीमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिका वेळेत रुग्णालयात पोहोचण्यासाठी रस्ता मोकळा करण्याचे काम त्यांनी मनापासून केले. यातून त्यांनी अत्यवस्थ रुग्णांना जीवदान मिळण्यात हातभार लावला.
जबाबदार नागरिक बनण्यावर त्यांचा विश्वास आहे आणि इतरांनीही रस्त्यावर जबाबदारीने वागावे, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.