Baramati: अजित पवारांनी पत्नी सुनेत्रा पवारांसोबत लुटला कॅरम खेळण्याचा आनंद
पुणे जिल्ह्यातील बारामतीत ज्येष्ठ नागरिक निवास कै. रघुनाथ गेनबा बोरावके चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘मेहता भोजन कक्ष’ आणि ‘श्रमण करमणूक केंद्रा’च्या नूतन इमारतीचे उदघाटन २१ मे रोजी (रविवारी) विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासोबत केंद्रात कॅरम खेळण्याचा आनंद घेतला. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
अजित पवार रविवार बारामतीतील करमणूक केंद्राच्या इमारतीच्या उद्घाटनाला पोहोचले होते. या करमणूक केंद्राच्या निमित्ताने ज्येष्ठ नागरिकांसाठी बुध्दीमळ, कॅरम अशा खेळांची सोय निर्माण करुन देण्यात आली होती. यावेळी नूतन इमारतीच्या उद्घाटनांतर येथे ठेवलेल्या कॅरम व सोंगटया बघून कॅरम खेळण्याची इच्छा अजित पवारांना झाली.
त्यानंतर अजित पवार कॅरम खेळण्यासाठी खुर्चीवर बसले. यावेळी त्यांच्या प्रतिस्पर्धी म्हणून समोरच्या खुर्चीवर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार बसल्या होत्या. अजित पवारांनी स्वताः सोंगट्या लावल्या आणि नेम धरुन स्ट्रायकर मारला. त्यांच्या एका फटक्यात एक सोंगटी त्यांनी घालवली. त्यांच्या या कौशल्याने उपस्थित सर्वच अवाक झाले. सर्वांनीच टाळ्या वाजवून त्यांच्या या कौशल्याचे स्वागत केले.