संग्रहित छायाचित्र
पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया बुधवारी (दि.२०) पार पडणार आहे. त्यामुलए १८ ते २० नोव्हेंबर या दोन दिवसाच्या ७२ तासाता परिसरात ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास बंदी घालण्यात आली. ध्वनीक्षेपकाचा वापर केल्यास गुन्हा दाखल होणार असल्याचाही इशारा निवडणुक आयोगाने दिला आहेय
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ( बी.एन.एस.एस ) २०२३ चे कलम १६३ प्रमाणे आदेश ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास बंदी घालण्याचा आदेश निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणुक अधिकारी यांनी काढला आहे. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूका घेण्याचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. आचारसंहिता १५ ऑक्टोबर पासून निवडणूकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अस्तित्वात राहणार आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये १९८ शिरूर, २०२ पुरंदर, २०३ भोर, २०८ वडगावशेरी, २०९ शिवाजीनगर, २१० कोथरुड, १११ खडकवासला, २१२ पर्वती २१३ हडपसर २१४ पुणे कॅन्टमेंन्ट, २१५ कसबा पेठ असे एकूण ११ विधानसभा मतदार संघात बुधवारी (दि.२०) मतदान होणार असून मतमोजणी ही दिनांक २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूका या सुरळीतपणेच शांततेत पार पाडण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत फायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून राष्ट्रीय निवडणुक आयोगाने मतदान संबंधीत शेवटच्या ७२ तासात मतदान प्रक्रिया संपेपर्यंत पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारे ध्वनीक्षेपकाचा वापर करण्यास मनाई असल्याबाबत आदेश दिला आहे. आदेश संपूर्ण पुणे पोलीस आयुक्तालयाचे हद्दीत दिनांक १८ नोव्हेंबरचे संध्याकाळी ६ वाजल्यापासून ते दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत लागू राहील. या आदेशाचा भंग करणारी व्यक्ती भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार शिक्षेस पात्र राहील. असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.