संग्रहित छायाचित्र
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बेकायदेशीर शेळ्यांच्या बाजारपेठा मोठ्या प्रमाणात वाढतात. त्यामुळे बकरी व्यापाऱ्यांना पुणे पोलीसांनी नोटीस बजावली आहे. बकरी ईद उत्सवातील नागरिकांची गैरसोय आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलीसांनी कोंढव्यातील बकरी व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे.
येत्या २९ जून रोजी बकरी ईद सण साजरा होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेळ्यांचे बाजार भरतात. शिवाय पुण्यातील कोंढव्यातील बाजारात देशभरातील व्यापारी येताना दिसतात. मात्र, अशातच बेकायदेशीपणे बाजार भरवण्याच्या घटना समोर येतात. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊन वाहतूकीला देखील मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. दरम्यान, गतवर्षी रस्त्यावर बाजार भरवणे, हायवेवर शेळ्या सोडणे, अशा प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या. यामुळे परिसरात देखील अस्वच्छ होते, दुर्गंधी येते असल्याने नागरिक त्रस्त झाले होते.
व्यापाऱ्यांच्या या कृतीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला होता. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारीनंतर पुणे पोलीसांनी बकरी व्यापाऱ्यांना नोटीस बजावली आहे. पोलीसांनी एकूण १२ बकरी व्यापाऱ्यांना आणि बाजार चालकांना फोजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४९ अन्वये नोटीस बजावली आहे. यामध्ये रस्त्यावर शेळ्या येणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी, कामकाजाच्या वेळेत वाहतूक सुरळीत राहील याची काळजी घ्यावी, अशा प्रकारच्या सुचना करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे बकरी व्यापाऱ्यांना नोटीस बजावण्याची ही पहिलीच वेळ आहे.