संग्रहित छायाचित्र
रेल्वेने पुणे ते सातारा या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-सातारा रेल्वे मार्गावरील नीरा-लोणंद स्थानकांदरम्यान ब्लॉक घेऊन रेल्वे ट्रॅक दुहेरीकरणाशी संबंधित विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. या कामामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर, काही गाड्यांचे मार्ग अंशतः रद्द केले आहेत. यामध्ये १२ ते २१ ऑक्टोबर दरम्यान गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
या गाड्या राहतील रद्द !
-पुणे-फलटण -पुणे, लोणंद - फलटण - लोणंद आणि पुणे - सातारा - पुणे या डेमू गाड्या रद्द.
-२१ आणि २२ ऑक्टोबर रोजी सुटणारी पुणे -कोल्हापूर-पुणे एक्स्प्रेस ही कोल्हापूर-सातारा-कोल्हापूर दरम्यान धावेल. त्यामुळे ही गाडी पुणे - सातारा-पुणे दरम्यान रद्द राहील.
-२२ ऑक्टोबर रोजी सुटणारी मुंबई - कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून नियमित प्रस्थानाऐवजी दोन तास उशिराने म्हणजेच सकाळी १० वाजून ४० मिनिटांनी सुटेल.
-कोल्हापूर- मुंबई कोयना एक्सप्रेस छत्रपती शाहू महाराज टर्मिनस कोल्हापूर येथून नियमित प्रस्थाना ऐवजी दोन तास ३० मिनिटे उशिराने म्हणजेच सकाळी १० वाजून ४५ मिनिटांनी सुटेल.
-ब्लॉक कार्यामुळे १५ ते २० ऑक्टोबर दरम्यान सुटणारी कोल्हापूर- पुणे एक्स्प्रेस काही विलंबाने धावेल.
-२१ ऑक्टोबर रोजी चंदीगडहून सुटणारी चंदीगड यशवंतपुर एक्स्प्रेस पुणे विभागात काही विलंबाने धावेल.
© Civic Mirror - Lexicon Broadcasting.
Licensor - Bennet and Coleman Co Ltd.