Trains Canceled : प्रवाशांनो लक्ष द्या, पुणे – दौंड मार्गावरील अनेक गाड्या दोन दिवस रद्द

२ आणि ३ ऑक्टोबरला काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गाड्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने माहिती दिली आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 2 Oct 2023
  • 11:20 am
 Trains Canceled : प्रवाशांनो लक्ष द्या, पुणे – दौंड मार्गावरील अनेक गाड्या दोन दिवस रद्द

प्रवाशांनो लक्ष द्या, पुणे – दौंड मार्गावरील अनेक गाड्या दोन दिवस रद्द

पाटस स्थानकावर ब्लॉक घेण्यात य़ेणार असल्याने गाड्या रद्द

पुणे ते दौंड मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे – दौंड रेल्वे मार्गावरील पाटस स्थानकावर ब्लॉक घेण्यात आहे. या दरम्यान, विविध तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे २ आणि ३ ऑक्टोबरला काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच गाड्या सुटण्याच्या आणि पोहोचण्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. याबाबत मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने माहिती दिली आहे.

आज म्हणजेच २ ऑक्टोबरला इंदूरहून सुटणारी इंदूर – दौंड एक्स्प्रेस ही गाडी पुण्यापर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला दौंडवरून सुटणारी दौंड – इंदूर एक्स्प्रेस ही गाडी पुण्यातून सुटेल. हैदराबादहून सुटणारी हैदराबाद – हडपसर एक्स्प्रेस ही गाडी २ ऑक्टोबरला दौंडपर्यंत धावेल. तसेच ३ ऑक्टोबरला हडपसरवरून सुटणारी हडपसर – हैदराबाद एक्स्प्रेस ही गाडी दौंडमधून सुटेल.

पुणे -सोलापूर -पुणे एक्स्प्रेस, पुणे- बारामती पैसेंजर, पुणे – दौंड पैसेंजर, बारामती – दौंड पैसेंजर, दौंड -पुणे पैसेंजर आणि दौंड- हडपसर पैसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याचवेळी काही गाड्या सुटण्याची आणि पोहोचण्याची ठिकाणे बदलण्यात आली आहेत.

याचबरोबर सोलापूर – पुणे डेमु २ ऑक्टोबरला दौंड – पुणे दरम्यान रद्द राहील. बारामती -पुणे पैसेंजर ३ ऑक्टोबरला दौंड – पुणे दरम्यान रद्द राहील. पुणे- बारामती पैसेंजर ३ ऑक्टोबरला पुणे – दौंड दरम्यान रद्द राहील. हडपसर- सोलापूर डेमू गाडी ३ ऑक्टोबरला हडपसर – दौंड दरम्यान रद्द राहील.

तसेच ब्लॉकच्या कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस, नागरकोईल – मुंबई, बंगळुरू- मुंबई उद्यान, जम्मूतावी- पुणे झेलम, अमरावती – पुणे आणि कराईकल- लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस विलंबाने धावतील.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest