PMPML : पीएमपीएमएलचे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, बोनस आणि बक्षिसाला मान्यता

यंदा ही बुधवारी (दि.११) झालेल्या ठरावानुसार कर्मचाऱ्यांना बोनस व बक्षीस देण्याच्या रकमेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Thu, 12 Oct 2023
  • 04:24 pm
PMPML : पीएमपीएमएलचे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, बोनस आणि बक्षिसाला मान्यता

पीएमपीएमएलचे कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट, बोनस आणि बक्षिसाला मान्यता

पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे (PMPML) दरवर्षी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) व बक्षिस रक्कम दिली जाते. यंदा ही बुधवारी (दि.११) झालेल्या ठरावानुसार कर्मचाऱ्यांना बोनस व बक्षीस देण्याच्या रकमेला मान्यता मिळाली आहे. त्यामुळे, पीएमपीएमएलच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

संचालक मंडळाच्या ठरावानुसार मूळ वेतन + महागाई भत्ता यावर ८.३३ टक्के प्रमाणे बोनस व रूपये २१ हजार इतकी बक्षिस रक्कम दिवाळीपूर्वी अदा करण्यात येणार आहे. बोनस व बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करण्यात येणार आहे. सानुग्रह अनुदान व बक्षिसाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करणेत येणार आहे. सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम जाहीर झाल्यामुळे पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

पीएमपीएमएलचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी केलेल्या सांघिक प्रयत्नांमुळे गेल्या महिन्यांत जवळपास सर्व शेड्युल मार्गस्थ होवून प्रवाशांना प्रवासी भिमुख सेवा देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. यापुढील काळातही सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना प्रवासी केंद्रीत सेवा देण्यासाठी सांघिक प्रयत्न करावेत. पीएमपीएमएल कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सानुग्रह अनुदान व बक्षिस रक्कम देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला, असे पीएमपीएमएलचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले.

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest