पीएमपीएमएलच्या आणखी एका पर्यटन बसचा शुभारंभ

रविवार (दि. २५ जून) पर्यटन बससेवा क्र. ६ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन बसस्थानक येथे वातानुकूलित ई-बसला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. ६ चा शुभारंभ करण्यात आला.

  • By PuneMirror Bureau
  • Reported By Omkar Gore
  • Mon, 26 Jun 2023
  • 10:26 am
पीएमपीएमएलच्या आणखी एका पर्यटन बसचा शुभारंभ

पीएमपीएमएलच्या आणखी एका पर्यटन बसचा शुभारंभ

प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी सेवा

पुणे महानगर परिवहन महामंडळाने सुरू केलेली पर्यटन बससेवा पर्यटकांच्या पसंतीस उतरत आहे. रविवार (दि. २५ जून) पर्यटन बससेवा क्र. ६ चा शुभारंभ परिवहन महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे यांच्या हस्ते करण्यात आला. पीएमपीएमएलच्या पुणे स्टेशन बसस्थानक येथे वातानुकूलित ई-बसला हिरवा झेंडा दाखवून पर्यटन बससेवा क्र. ६ चा शुभारंभ करण्यात आला. पर्यटन बससेवा क्र. ६ द्वारे पहिल्याच दिवशी २४ पर्यटकांनी सफर केली.

यावेळी पुणे स्टेशन डेपोचे मॅनेजर संजय कुसाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, सहव्यवस्थापकीय संचालिका प्रज्ञा पोतदार-पवार यांच्या संकल्पनेतून पुणे दर्शन बससेवेच्या धर्तीवर पुणे व पिंपरी चिंचवड शहरांनजीकच्या धार्मिक व पर्यटन स्थळांकरिता ७ पर्यटन बस मार्ग निश्चित करण्यात आली आहे. वातानुकूलीत बसेसव्दारे विशेष 'पर्यटन बस' सेवा प्रत्येक आठवड्याच्या शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी ०१ जून २०२३ पासून सुरू करण्यात आलेली आहे. या 'पर्यटन बस' सेवेकरिता प्रति प्रवासी तिकीट दर ५०० रुपये इतका आकारण्यात येतो.

यावेळी बोलताना महामंडळाचे महामंडळाचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर (ऑपरेशन) सतिश गव्हाणे म्हणाले कि, पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून किफायतशीर दरात सुरू करण्यात येत असलेल्या वातानुकूलीत पर्यटन बससेवेचा लाभ भक्तगण, भाविक व पर्यटक यांनी घ्यावा.

पर्यटन बससेवा क्र. ६ चा मार्ग व सुटण्याची वेळ

मार्ग - पुणे स्टेशन, वाघेश्वर मंदिर (वाघोली), वाडेबोल्हाई, छ. संभाजी महाराज समाधीमंदिर (वढू बुद्रुक), रांजणगांव गणपती, पुणे स्टेशन.

बस सुटण्याची वेळ – ०९:००

बस पोहोचण्याची वेळ - १७:३०

बसचा पहिला व शेवटचा थांबा – पुणे स्टेशन बसस्थानक.

प्रति प्रवासी तिकीट दर – ५०० रूपये

बुकिंग ठिकाण - १) डेक्कन जिमखाना, २) पुणे स्टेशन, ३) स्वारगेट, ४) कात्रज, ५) हडपसर गाडीतळ, ६) भोसरी बसस्थानक, ७) निगडी, ८) मनपा भवन या महामंडळाच्या पास केंद्रावरून.

 

Join Civic Mirror Whatsapp Group for Latest Update

Share this story

Latest